Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगआता शालेय विद्यार्थ्यांना आहारात मिळणार उकडलेली अंडी, अंडा बिर्याणी, पुलाव! 

आता शालेय विद्यार्थ्यांना आहारात मिळणार उकडलेली अंडी, अंडा बिर्याणी, पुलाव! 

शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून कंत्राट माध्यमातून शाळांना पोषक आहाराचा पुरवठा करण्यात येतो. हा पोषण आहार प्राथमिक शाळेतील वर्ग पहिला ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दिला जातो.

 

आता या आहारातच आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहारात वाढ होणार आहे.

 

आता विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ राहण्यासाठी तसेच त्यांना पौष्टिक आणि सकस आहार मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात येणार आहे. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना आठवड्यातून एकदा केळी खाण्यासाठी देण्यात येणार आहे. या नियमानुसार, बुधवारी वा शुक्रवारी शाळेत विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल.

 

राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना अंडी खाण्यास देण्यात येणार आहेत. परंतु जे विद्यार्थी शाकाहारी आहेत त्यांना अंड्याऐवजी केळी वा इतर एखादे फळ देण्यात येईल. शालेय विभागाकडून हा उपक्रम 23 आठवड्यांसाठी राबवला जाईल. या काळामध्ये शालेय विभाग विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यावर जास्त भर देतील. सध्या, ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समिती आणि नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तसेच, आहार बनवणाऱ्यांमार्फत हा उपक्रम राबवण्याच्या सूचना शालेय विभागाने दिल्या आहेत.

 

दरम्यान, शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर चांगला आहार देखील पुरवला जात आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना पूरक पौष्टिक पदार्थ पुरवण्यात येतात. आता या पदार्थांमध्ये आणखीन भर करण्यात आली आहे. अंड्यामध्ये अनेक पौष्टिक गुण असतात. त्यामुळे दिवसातून एक तरी अंडे खावे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. त्यामुळे या दृष्टीकोनातूनच आठवड्यातून एक दिवस तरी विद्यार्थ्यांना अंडे खाण्यासाठी देण्यात यावे असा निर्णय शालेय विभागाने घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -