Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली

कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोकरुड येथे एका खासगी बसचा अपघात झाला. येथील वारणा नदीच्या पुलावरुन खाली एक खासगी बस कोसळल्याची घटना समोर आली आहे, ही घटनीा सकाळी ८ वाजता घडली.

 

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान पावलो कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी शाहूवाडी-कराड मार्गे जात होते. ही बस अमेणी घाट मार्गे कोकरुड पुलावर आली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे ही बस पुलावर वारणा नदील कोसळली. या अपघातात एकुण ४० प्रवासी प्रवास करत होते, काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

अपघात झाल्यानंतर काही वेळातच स्थानिकांनी आणि पोलिसांनी मदत मोहिम राबवली. यामधील अडकलेल्या प्रवशांना बाहेर काढले आणि त्यांनी रुग्णालयात दाखल केले. वारणा नदी पात्रात पाणी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -