राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकरिता महत्वाची बातमी समोर येतेय. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात 1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता जाहीर केला असून तो 4 टक्क्यांनी वाढला आहे.
विशेष म्हणजे 42 टक्क्यांवर असलेला डीए आता 46 टक्क्यांवर आणला आहे. तसेच ही रक्कम बेसिक पेमध्ये समाविष्ट होणार असल्याचेही समजतेय.
केंद्र सरकारने 20 ऑक्टोबर रोजी डीए वाढीचा आदेश काढला होता. त्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा सरकारने विचार केला होता. त्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून सुमारे 60 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना या डीए वाढीचा लाभ होणार आहे.
थोडक्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदाची जाणार आहे. महागाई भत्त्यातील वाढ ही 1 जुलैपासून मिळणार आहे. म्हणजेच गेल्या चार महिन्यांची थकबाकी नोव्हेंबरच्या वेतनात जमा होणार असल्याचे वित्त खात्याचे अवर सचिव नरेश गावडे यांनी सांगितलेआहे.
तसेच राज्य सरकारचे कर्मचारी आणि सरकारी अनुदानित शिक्षण संस्थांमधील जे सरकारच्या वेतन नियमानुसार पगार घेतात त्यांच्या डीएमध्ये ही वाढ आहे.