Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगतुम्हीही स्वस्तात सिलिंडर मिळवा! उज्ज्वला योजनेंतर्गत करा अर्ज 

तुम्हीही स्वस्तात सिलिंडर मिळवा! उज्ज्वला योजनेंतर्गत करा अर्ज 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून(ujjwala yojana) महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले जात आहेत. त्यामुळे महिलांना लाकूड गोळा करून अन्न शिजवावे लागत नाही. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मोठी मदत होत.

 

जर आपण या सिलिंडरच्या(ujjwala yojana) किंमतीबद्दल बोललो, तर या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या सिलिंडरची सध्याची किंमत 600 रुपये आहे. अशातच तुम्हीही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचा विचार करत असाल तर, यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही? हे तुम्हाला आधी जाणून घ्यावे लागेल.

 

कोणते लोक आहे पात्र?

 

-तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे.

 

-जर तुम्ही स्त्री असाल.

 

-तुमच्या घरात आधीपासून एलपीजी कनेक्शन नसेल.

 

-जर तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल आणि नाव बीपीएल यादीत असेल.

 

-जर तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर इ.

 

तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता:-

 

-जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. pmuy.gov.in/index.aspx

 

-त्यानंतर येथे तुम्हाला ‘Apply for New Ujjwala 2.0 Connection’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

 

यानंतर तुम्हाला एचपी, इंडेन किंवा भारत गॅसमधून कोणताही एक वितरक निवडावा लागेल.

 

आता तुम्हाला ‘Register Boat’ वर क्लिक करून माहिती भरावी लागेल आणि नंतर लॉगिन करावे लागेल.

 

-यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावी लागतील.

 

-कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाते.

 

-सर्व काही बरोबर आढळल्यास, तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन दिले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -