Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगरेशन कार्डवर मिळणार मोफत साड्या! सरकारने आणली भन्नाट योजना

रेशन कार्डवर मिळणार मोफत साड्या! सरकारने आणली भन्नाट योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती सण आणि दिवाळी उत्सवानिम्मित राज्य सरकार “आनंदाचा शिधा” वाटप करते. परंतु आता राज्य सरकारने निश्चित केलेल्या या सणांच्यावेळी दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शुक्रवारी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचा राज्यातील 24 लाख 58 हजार 747 कुटुंबाना फायदा होणार आहे.

 

वस्त्रोद्योग विभागाकडून 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणामुळे, शिधापत्रिकाधारकांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रावर विणलेली एक साडी मोफत देण्यात येणार आहे. ही योजना 2023 ते 2028 अशा पाच वर्षांसाठी नियोजित करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्व पात्र कुटुंबांना पुढचे पाच वर्षे मोफत साडीचा लाभ घेता येणार आहे. या साडीचे वाटप दिवाळी सण, गौरी गणपती सण, आंबेडकर जयंती अशा महत्त्वाच्या सणात दिवशी करण्यात येईल.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ 24 लाख 58 हजार 747 कुटुंबांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या साड्या रेशन दुकानात वाटप करण्यात येतील. ही योजना राज्य यंत्रमाग महामंडळाकडून राबविण्यात येणार आहे.

 

त्याकरिता महामंडळ 2023-24 या वर्षासाठी एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे. मुख्य म्हणजे, या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, होणारा सर्व खर्च राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. खास म्हणजे, या योजनेमुळे महीला वर्गाला सणवारांवेळी नविन साड्या मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -