Saturday, November 23, 2024
Homeअध्यात्म१२ नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी उठताच करा हे काम होईल...

१२ नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी उठताच करा हे काम होईल धनवर्षा!

दिव्यांचा दैदिप्यमान महोत्सव म्हणजेच दिवाळी.. धनाच्या देवी माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस म्हणजेच दिवाळी समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तो दिवस म्हणजेच दिवाळीचा दिवस त्याचबरोबर भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले तो म्हणजे दिवाळीचा दिवस माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रगट झाली त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले होते.

 

त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश होता त्यामुळेच या दिवशी भांडी खरेदी करण्याचे विधान आहे. चांगले आरोग्य आणि धनप्राप्तीसाठी आपण या दिवसापासूनच काही उपाय करायचे आहेत. पूजा पाठ तर आपण करालच पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून स्थायी निवास करेल अशा काही गोष्टी आहेत असे काही उपाय आहेत जे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज करायला हवेत.

 

दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळपासून आपण काय करावे. सकाळी उठल्यानंतर घरातल्या महिलांनी काय करावे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरात प्रवेश करेल. याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपल्या तळहातामध्ये पहावे.. व कराग्रे वसते लक्ष्मी.. करमुले सरस्वती.. कर मध्ये तू गोविंदम्.. प्रभाते करदर्शनम्.. हा श्लोक आपण म्हणावा तसे तर हे दररोज करणे खुप गरजेचे आहे.

 

पण कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तरी तुम्ही हे नक्की करा. त्यानंतर आपण आपल्या नाकाजवळ हात ठेवून कुठल्या नाकपुडीतून श्वास चालू आहे हे चेक करावे आणि हे पहावे आणि ज्या नाकातून श्वास येत आहे ज्या नागपुडीतून श्वास चालू आहे. तोच पाय तुम्ही जमिनीवर ठेवायचा आहे स्नानादीने निवृत्त झाल्यानंतर आपण घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडायचे आहे. गंगाजल नसेल तर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी देखील तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे गंगाजल किंवा तांब्यात ठेवलेले पाणी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचे आहे.

 

त्यानंतर एका बादलीमध्ये थोडेसे मीठ घालून त्या पाण्याने आपल्याला लादी पुसायची आहे फरशी पुसायची आहे साध्या पाण्याने तर तुम्ही दररोजच लादी पुसत असाल पण दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला मीठ मिश्रित पाण्यानेच घरातील लादी पुसायची आहे. यामुळे आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण लावावे यासाठी तुम्ही आंब्याची किंवा अशोकाची पाने वापरू शकता पण आंब्याची पाने लावल्यास ते अतिउत्तम त्याचबरोबर यासाठी तुम्ही झेंडूची फुले देखील वापरू शकता.

 

त्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला हळदीमध्ये थोडेसे पाणी मिक्स करून या हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे तुम्ही कितीही स्टिकर्स लावले तरीही हळदीने काढलेले हे स्वस्तिक सर्वोत्तम आहे दुसऱ्या दिवशी हळदी काढलेले स्वस्तिक पुसून तुम्ही नवीन स्वस्तिक काढायचे आहे अशा प्रकारे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सकाळी तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावर नवीन स्वस्तिक काढायचे आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या उजव्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला एका मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचे आहे.

 

हे पाणी घेऊन या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या किंवा इतर कुठल्याही फुलांच्या पाकळ्या आपल्याला ठेवायच्या आहेत. हे करायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ही होती अशी काही कामे जी प्रत्येक महिलेने दिवाळीच्या दिवसांमध्ये करायला हवीत ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये धन वैभव पैसा कधीही कमी पडत नाही.

 

आपल्या आर्थिक समस्या दूर होतात आणि अडलेली कामे मार्गी लागतात आणि आपले भाग्य उजळते प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होते आणि जेथे मेहनत आणि नशिबाची साथ असेल तिथे नेहमीच यश प्राप्त होत असते असे छोटे छोटे उपाय केल्याने देखील आपल्या जीवनामध्ये मोठे बदल झालेले आपल्याला दिसून येतील तुम्ही देखील दिवाळीच्या दिवसांमध्ये हे उपाय नक्की करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -