दिवाळी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षक कुटुंबियांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३-३ अशा ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास राजस्थानमध्ये घडली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३-३ अशा ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा सोनवणे (वय ५०), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (वय ५), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय १) मृतांची नावे आहेत.कार कंटेनरवर धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मृत शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्यानंतर धनराज नागराज सोनवणे आणि योगेश धोंडू साळुंखे या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब कारने राजस्थान फिरायला जायचे ठरले होते.दोन्ही कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. डोरीमना गावाजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारने एका कंटेनरला धडक दिली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत शिक्षक कुटुंबीयावर काळाने घाला घातल्याने अमळनेर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.