Friday, June 21, 2024
Homeब्रेकिंगआता व्हॉट्सअ‍ॅपचा ठराविक डेटाचा होणार बॅकअप, कंपनीने बदलला मोठा नियम

आता व्हॉट्सअ‍ॅपचा ठराविक डेटाचा होणार बॅकअप, कंपनीने बदलला मोठा नियम

 

 

व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलने मिळून एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच कंपनी अनलिमिटेड डेटा बॅकअपचा पर्याय बंद करणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज आणि सर्व डेटा गुगलवर बॅकअप होतो. याला कोणतीही लिमिट नाही. मात्र, लवकरच केवळ लिमिटेड डेटा बॅकअप करता येणार आहे.WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने याबाबत यूजर्सना इन-अ‍ॅप अलर्ट देण्यास सुरुवात केली आहे. सोबतच व्हॉट्सअ‍ॅप हेल्प सेंटरवर देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे नियमितपणे आपले फोटो, व्हिडिओ आणि चॅटचा बॅकअप घेणाऱ्या यूजर्सचं नुकसान होणार आहे.किती डेटा होणार बॅकअप?कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता केवळ 15 GB पर्यंतचा डेटाच गुगलवर बॅकअप होणार आहे. याचा अर्थ, गुगल जेवढी स्टोरेज आपल्या यूजर्सना मोफत देते, तेवढाच डेटा बॅकअप होणार आहे.गुगलने आपल्या सर्व्हरवर जास्त जागा करण्यासाठी याबाबत निर्णय घेतला आहे. यापूर्वी देखील गुगलने यासाठीच वापरात नसलेले जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलवर अधिक स्टोरेज स्पेस हवं असल्यास तुम्ही 1.99 डॉलर्स प्रति महिना एवढ्या किंमतीला गुगल वनचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. यामुळे तुम्हाला 100 GB स्टोरेज मिळेल.बॅकअपची साईज अशी करा कमीकित्येक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये टाईमपास गप्पाच भरपूर होतात. यामुळे फायदा तर काही होत नाही, मात्र स्टोरेज स्पेस वापरला जातो. त्यामुळे असे मेसेज आपोआप डिलीट होण्यासाठी तुम्ही Disappearing Messages हे फीचर सुरू करू शकता.तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Media Auto Downland हा ऑप्शन सुरू असेल, तर सर्व ग्रुपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होतात. हा पर्याय बंद करून तुम्ही केवळ आवश्यक तोच डेटा डाऊनलोड करू शकता. यामुळे भरपूर जागा आणि डेटा देखील वाचणार आहे. (Tech News)आवश्यक नसणारे फॉरवर्डेड फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी डिलीट करून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज क्लीन करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -