Tuesday, November 28, 2023
Homeब्रेकिंगसलमानच्या 'टायगर 3'ची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस...

सलमानच्या ‘टायगर 3’ची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. लवकरच हा सिनेमा जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करेल. टायगर 3’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… (Tiger 3 Box Office Collection)

‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 44.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी आणि पाचव्या दिवशी 18.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने 187.65 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने आतापर्यंत 270.55 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल.

 

पहिला दिवस : 44.5 कोटी

दुसरा दिवस : 59.25 कोटी

तिसरा दिवस : 44.3 कोटी

चौथा दिवस : 21.1 कोटी

पाचवा दिवस : 18.50 कोटी

एकूण कमाई : 270.55 कोटी

‘टायगर 3’ या सिनेमाने चांगलीच ओपनिंग केली. पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घसरण होत असल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. शाहरुखच्या पठाणने रिलीजच्या पाचव्या दिवशी 60.75 कोटींची कमाई केली होती. तर जवानने 32.92 कोटींची कमाई केली होती. ‘गदर 2’चं पाचव्या दिवशीचं कलेक्शन 55.40 कोटी रुपये होतं. या सर्वांच्या तुलनेत टायगरचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन खूपच कमी आहे.सलमानच्या ‘टायगर 3’चा जगभरात बोलबाला

सलमान खानच्या ‘टायगर 3’ या बहुचर्चित सिनेमाचा जगभरात बोलबाला पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. परदेशातील सलमानचे चाहते मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहायला जात आहेत.

 

‘टायगर 3’ हा स्पाय यूनिवर्सचा पाचवा सिनेमा आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमराम हाशमी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर हृतिक रोशन आणि शाहरुख खानची झलकही या सिनेमात पाहायला मिळत आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’नंतर ‘टायगर 3’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र