Wednesday, August 6, 2025
Homeक्रीडाटीम इंडिया-ऑस्ट्रेलिया 20 वर्षांनी पुन्हा वर्ल्ड कप फायनलमध्ये, रोहितसेना पराभवाचा वचपा घेणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया 20 वर्षांनी पुन्हा वर्ल्ड कप फायनलमध्ये, रोहितसेना पराभवाचा वचपा घेणार?

 

दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विजयी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 47.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया या विजयासह वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाची ही वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची आठवी वेळ ठरली आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कप 2023 मधील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने भिडणार आहेत.टीम इंडियाने बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडवर 70 धावांनी मात केली. टीम इंडिया यासह फायनलमध्ये पोहचली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली. आता टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 वर्षांनी पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना होणार आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2003 वनडे वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 125 धावांनी विजय मिळवला होता.त्यामुळे टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाला अंतिम सान्यात पराभूत करुन 20 वर्षांचा जुना हिशोब चुकता करण्याची संधी आहे.सामना कधी कुठे आणि केव्हा?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप फायनल सामना हा रविवारी 19 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे आता साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे या अंतिम सामन्याकडे लागून राहिलं आहे.

 

फायनलमध्ये 20 वर्षांनी पुन्हा आमनेसामनेआयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

 

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -