Friday, December 27, 2024
Homeक्रीडा“मोहम्मद शमीला अटक…” भारताच्या न्यूझीलंडवरील विजयानंतर दिल्ली पोलिसांचे ट्वीट; मुंबई पोलिस उत्तर...

“मोहम्मद शमीला अटक…” भारताच्या न्यूझीलंडवरील विजयानंतर दिल्ली पोलिसांचे ट्वीट; मुंबई पोलिस उत्तर देत म्हणाले….

 

 

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा दणदणीत पराभव केला. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील विजयाने भारताने अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. २०१९ मध्ये भारताला अंतिम फेरीतून बाहेर काढणाऱ्या न्यूझीलंड संघाला ७० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला जात असले तरी विजयाचा खरा हीरो ठरलेल्या मोहम्मद शमीचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. शमीच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला सहज विजय मिळवता आला. त्यामुळे सामना संपण्यापूर्वीच मोहम्मद शमी सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या ट्रेंडमध्ये सहभागी होण्यापासून दिल्ली आणि मुंबई पोलिसही स्वत:ला रोखू शकले नाहीत. दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी या विजयाच्या जल्लोषात हटके ट्वीट केले आहे.

 

दिल्ली व मुंबई पोलिसांचे व्हायरल ट्वीट

सर्वप्रथम दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना एक ट्वीट टॅग करीत लिहिले की, मुंबई पोलीस, आम्हाला आशा आहे की आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही. दिल्ली पोलिसांच्या या ट्वीटला उत्तर देत मुंबई पोलिसांनी लिहिले की, दिल्ली पोलिस, शमीविरोधात असंख्य लोकांची मने चोरण्याचे (मन जिंकण्याचे) कलम लावायला तुम्ही विसरलात आणि सहआरोपींची यादीही दिली नाही’. यात मुंबई पोलिसांचे असे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिसांनी सामन्याचे नायक विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, के. एल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -