देशासह राज्यातही दिवसेंदिवस उच्चशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसतेय. देश पातळीवर बेरोजगारी मिटवण्याचा प्रयत्न केला जात असताना राज्याच्या धर्तीवरही हेच प्रयत्न सुरु आहेत. महायुती सरकारने यासाठी आता मेगा प्लॅन आखला आहे. खासगी कंपन्यांसाठी मुलाखतीनंतर लगेचच नोकरी देण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नागपुरातून या योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे