Wednesday, December 4, 2024
Homeकोल्हापूरराजू शेट्टींच्या आंदोलनामुळं जिल्ह्यात हिंसक वळण, कायदा-सुव्यवस्था बिघडली; काय म्हणाले सतेज पाटील?

राजू शेट्टींच्या आंदोलनामुळं जिल्ह्यात हिंसक वळण, कायदा-सुव्यवस्था बिघडली; काय म्हणाले सतेज पाटील?

 

 

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) पुकारलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, आमची माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याशी चर्चा सुरू आहे; पण आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेट्टी यांच्याशी चर्चा करावी, अशी अपेक्षा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या गूळ सौद्यावेळी पाटील बोलत होते. ते (Satej Patil) म्हणाले,‘ दराबाबत शेट्टी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. हंगाम लांबल्याने कारखान्यांचे नुकसान होत आहे. ऊस तोड टोळ्या परत जात आहेत. टोळ्या परत गेल्या तर कारखानदारांचे चार-पाच कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच शेट्टी यांच्याशी चर्चा करावी, यासाठी शक्य असल्यास त्यांना मुंबईला निमंत्रित करावे.’यावेळी उपस्थित पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जबरदस्तीने ऊस तोडीचा संघटनेचा आरोप चुकीचा आहे. शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे, एक-दोन दिवसांत मार्ग निघेल. पोलिस बंदोबस्तात ऊस तोडण्याचा प्रश्‍नच नाही.’राजकारण-नाती वेगळीबारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबीयांच्या दिवाळी समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याकडे मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘राजकारण व नाती वेगळी असतात. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या घरी आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे बारामतीतील गोविंद बागेतील त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्‍न उपस्थित करणे चुकीचे आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -