राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.आज (दि.१७) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :
१) मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार
२) राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
३) आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
४) राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी