चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन कार्तिकी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरसने शिरकाव केला आहे. शहरात झिका व्हायरचा रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे.
तसंच नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे.यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणे नंतर पंढरपूर (Pandharpur News) शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षणे (Symptoms) आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे.
झिका व्हायरसची लक्षण कोणती?
ताप येणं, डोकं दुखी आणि मळमळणे अशी छिका आजाराची प्राथमिक लक्षणं दिसू येतात. प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धुळ फवारणी सुरू केली.याशिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. बाधित परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सर्व्हे केला असून ४ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली आहे.
पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे. दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढली आहे. पदस्पर्श दर्शनाची रांग दोन किलोमीटर अंतरावर गेली आहे.