आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) रणसंग्रामाची सांगता झाली आहे. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं (Australian Cricket Team) भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं. टीम इंडियाच्या (Team India) तोंडचा घास ऑसी संघानं हिरावून घेतला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. केवळ टीम इंडियाच्याच नाहीतर, तब्बल 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचाही चक्काचूर ऑसी संघानं केला. आता या दुःखातून सावरुन भारतीय क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) नव्या हंगामाची आतुरतेनं वाट पाहू लागले आहेत.
आगामी आयपीएलच्या हंगामासाठी येत्या 19 डिसेंबर रोजी दुबईत ऑक्शन पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, यापूर्वी आता पहिली ट्रान्सफर विंडो ओपन करण्यात आली आहे. या ट्रान्सफर विंडोची तारीख 26 नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. याला ट्रेडिंग विंडो असंही म्हटलं जातं. या अंतर्गत दोन फ्रँचायझी परस्पर संमतीनं त्यांचे आवडते खेळाडू ट्रेड करू शकतात.
आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होऊ शकतो. त्यामुळे पहिली ट्रान्सफर विंडो उघडली आहे. या हस्तांतरण विंडोची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्याला ट्रेडिंग विंडो असंही म्हणतात. या अंतर्गत दोन फ्रँचायझी परस्पर संमतीनं त्यांच्या आवडत्या खेळाडूंचा व्यापार करू शकतात. मात्र, यासाठी खेळाडूंचीही परवानगी घ्यावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यासाठी प्लेयर्सकडूनही परवानगी घ्यावी लागते.
आतापर्यंत दोन खेळाडूंची बदली झाली आहे. या महिन्यात म्हणजे, 3 नोव्हेंबर रोजी, रोमॅरियो शेफर्ड 2024 सीझनसाठी ट्रेड केलेला पहिला खेळाडू ठरला. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं शेफर्डला लखनौ सुपरजायंट्सला 50 लाखांमध्ये विकलं आहे.
दुसरा करार राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनौ फ्रँचायझी यांच्यात होता. राजस्थाननं डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलच्या जागी वेगवान गोलंदाज आवेश खानला घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ आणि खेळाडूंनी हा करार स्वीकारला. बीसीसीआयनंही याला मान्यता दिली आहे.
लखनौनं आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 10 कोटी रुपयांची बोली लावून आवेशला खरेदी केलं होतं. तर राजस्थाननं पडिक्कलसाठी 7.75 कोटी रुपये खर्च केले होते. या वर्षी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या फ्रँचायझीनं कायम ठेवलं होतं. परंतु, आता पुढील हंगामापूर्वी बदल दिसून येत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा आणखी एक मोठं ट्रेडिंग होऊ शकतं. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यात हा ट्रेड होऊ शकतो. पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी होऊ शकते. तर रोहित शर्मा गुजरात टायटन्समध्ये सामील होऊ शकतो. म्हणजेच, दोन्ही संघांच्या कर्णधारांची अदलाबदल होऊ शकते. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईनं आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. तर हार्दिकनं त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला पहिलं विजेतेपद मिळवून दिलं होतं.
एका खेळाडूला दोन प्रकारे ट्रेड केलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे, एखाद्याला त्या खेळाडूची फ्रेंचायझी स्वतः विकण्याची ऑफर देते तेव्हा किंवा दुसरं म्हणजे, फ्रँचायझीनं खेळाडू विकत घेण्यात स्वारस्य दाखवलं पाहिजं.
एखाद्या खेळाडूला ट्रेड करण्यासाठी फ्रँचायझीमध्ये केवळ पैशांबाबत चर्चा व्हायला हवी.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची परवानगी नसेल तर ट्रेड होऊ शकत नाही. म्हणजेच, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचीही मान्यता आवश्यक असेल.
एकापेक्षा जास्त फ्रँचायझींनी खेळाडू खरेदी करण्यात रस दाखवला तर अंतिम निर्णय विकणाऱ्या फ्रँचायझींवर असतो. ती तिच्या आवडीच्या फ्रँचायझीसह ट्रेड करू शकते.
एखाद्या खेळाडूचं ट्रेड करण्यापूर्वी किंवा त्याला दुसऱ्या संघात स्थानांतरित करण्यापूर्वी त्याची संमती घेणं आवश्यक आहे. तसेच, फ्रेंचायझी ‘आयकॉन’ खेळाडूचा ट्रेड करू शकत नाही.
आयपीएल 2024 सीझनचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासातील हा पहिलाच लिलाव असेल, जो परदेशात होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं लिलावाबाबत सर्व स्टेकहोल्डर्सना अंतर्गत पत्र पाठवलं आहे, ज्यामध्ये त्यांना 15 ते 26 डिसेंबर दरम्यान कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल लिलावाच्या ठिकाणाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. भारत असो वा परदेश, स्थळ निश्चित करण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. लवकरच लिलावाचं ठिकाण जाहीर केलं जाईल. दुसरीकडे, आयपीएल 2024 चा हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. याबाबत सरकारशी बरीच चर्चा सुरू आहे. कारण त्या काळात निवडणुकाही होणार आहेत.
जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला की, पुढील आयपीएल भारताबाहेर होणार का? यावर सूत्रांनी सांगितलं की, आयपीएलबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. गरज पडल्यास त्या आधारावर (आयपीएल परदेशात आयोजित करण्याचा) मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण सध्या देशातच आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार सुरू आहे. मागील आयपीएल म्हणजेच, 2023 च्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ चॅम्पियन बनला होता. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई या दोन्ही संघांनी सर्वाधिक प्रत्येकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे आतापर्यंत दोनदा आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकींमुळे आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेनं केलं होतं. यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे काही सामने भारतात आणि काही सामने युएईमध्ये खेळवण्यात आले होते.