Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरात तब्बल ५० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

कोल्हापूरात तब्बल ५० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने गोवा (alcohol delivery)बनवण्याची ५० लाख रुपये किमतीचे दारू आणि ३३ लाख रुपयांचे वाहन असा ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल दोघा तस्करांकडून जप्त केला.

 

पथकाने गगन बावडा रोडवर दोनवडे गावच्या हद्दीत सापळा रचून गोवा बनावटीची दारू(alcohol delivery) घेऊन जाणारा कंटेनर पकडला. यातून ५० लाख रुपये किंमतीचे १८० मिलीचे १२०० बॉक्स दारू व वाहन असे ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दीपक प्रकाश पोवार (वय ३२ रा.मडगांव ता.मडगांव जि.पणजी,गोवा) यास अटक केली आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविंद्र आवळे यांना खबऱ्याकडून समजलेल्या माहितीच्या आधारे गगन बावडा रोडवर भरारी पथकाला सापळा रचण्यास सांगितले होते. त्यानुसार निरीक्षक पी. आर. पाटील,दुय्यम निरीक्षक जी बी. कच्चे, विजय नाईक, व्ही. एम. माने, एस. टी. कुमरे, जवान सचिन लोंढे, राजेंद्र कोळी, विशाल भोई, मारुती पोवार, साजीद मुल्ला यांनी गुरवारी पहाटे सापळा रचून कटेनर पकडला.

 

या वाहनातून १८० मिलीचे १२०० बॉक्स दारू जप्त केली. दारूसह ८३ लाख, ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईवेळी अजय सुर्यकांत कवटणकर (रा.ओटवने,ता. सावंतवाडी, सिधुदूर्ग) व विवेक गुंडू मडूरकर (रा. मडूरा, सावंतवाडी,जि. सिंधूदुर्ग) हे दोघे फरारी झाले आहेत. ही दारू कुठे जाणार होती,त्याचा मुळ मालक कोण याचा पथक तपास करीत आहे. निरीक्षक पी. आर. पाटील पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -