Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगसंपामुळे डिसेंबरमध्ये बँका इतके दिवस राहणार बंद

संपामुळे डिसेंबरमध्ये बँका इतके दिवस राहणार बंद

डिसेंबर महिना म्हटला की, वर्षातील शेवटचा महिना. मात्र या महिन्यात बँका तब्बल 18 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. सरकारी सुट्ट्या, साप्ताहिक सुट्टा आणि बँक कर्मचार्‍यांचा सहा दिवसांचा संप यामुले तब्बल 18 दिवस बँक या डिसेंबर महिन्यात बंद राहणार आहेत.

 

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने डिसेंबरमध्ये 6 दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बँका या बंद राहणार आहेत. 4 डिसेंबर रोजी पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. या कालावधीत बँकच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.5 डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

तर 6 डिसेंबर रोजी कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपवावर जाणार आहे. तर 7 डिसेंबर रोजी इंडियन बँक, युको बँकचे कर्मचारी संपावर जाणार आहे. 8 डिसेंबर रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी संपावर जाणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी सर्व खाजगी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -