राज्याच्या पोलिस दलातील भरती (Police Recruitment) प्रक्रियेत सरकारने काही बदल केला आहे. त्यामध्ये सध्या सुरु असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यानंतर प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया जेव्हा सुरु होईल, तेव्हा लेखी परिक्षेअगोदर शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे. म्हणून यापुढे आता मैदानी चाचणीतील पास झालेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होणार?
राज्याच्या गृह विभागामध्ये जवजवळ साडेपाच ते सहा हजार पोलिस कर्मचारी (Police) प्रत्येक वर्षी सेवानिवृत्त होत असतात. कोरोनामुळे मागील काही महिन्यांत बऱ्याच पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाया गुन्हेगारांवर आपला वचक ठेवण्यासाठी गृह विभागामधील संपूर्ण पदे भरलेली असणे गरजेचं आहे.
राज्यात महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होत असतात. यामुळे मागच्या व चालू वर्षी (2020-21) या दोन्ही वर्षातील रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया एकत्रिपणे राबविली जाणार आहे. आताच्या वेळी 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरु आहे. या भरतीसाठी सुरुवातीस उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरु आहे.