Friday, July 4, 2025
Homeब्रेकिंगचीनमध्ये न्यूमोनिया; केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दिला सल्ला

चीनमध्ये न्यूमोनिया; केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दिला सल्ला

चीनमध्ये न्यूमोनिया; केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दिला सल्ल

 

चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या आजारांचा फैलाव झाल्याचे पुढे आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आरोग्य सज्जतेचा तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे.सध्याचा इन्फ्लुएंझा आणि हिवाळी हंगाम लक्षात घेता श्वसनाच्या आजाराचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

 

सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. डब्ल्यूएचओने चिनी अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त माहिती मागितली आहे, परंतु यावेळी चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे.

 

नमुने चाचणीला पाठवा

– राज्यांच्या अधिकाऱ्यांना या वर्षाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेल्या कोविड-१९च्या संदर्भात सुधारित लक्ष ठेवण्याच्या धोरणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लागू करा.

– विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये पसरणाऱ्या इन्फ्लूएंझासदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (एसएआरआय) वर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात यावे.

– राज्य अधिकाऱ्यांनी श्वासोच्छ्वासाचे आजार असलेल्या रुग्णांचे नाक आणि घशाचे स्वॅब नमुने विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांना पाठवावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -