Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगवर्षापूर्वीचा मेसेजही व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार; पण कसं?

वर्षापूर्वीचा मेसेजही व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार; पण कसं?

 

 

सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वजण उपयोग करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग आता कार्यालयीन कामासाठी सुद्धा केला जात आहे. कर्मचाऱ्यांना सुचना देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हे प्रभावी माध्यम बनलंय.

 

व्हॉट्सअप हे एक विनामूल्य, मल्टीप्लॅटफॉर्म मेसेजिंग अ‍ॅप आहे, ज्यातून आपण व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल करू शकतो. तिन्ही पद्धतीने आपण आपल्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहत असतो. त्यामुळे हे मेसेजिंग अ‍ॅप खूप लोकप्रिय झाले आहे.

 

यात कार्यालयीन कामासाठी याचा उपयोग केला जात असताना यातून कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या जातात. परंतु मेसेज जास्त झाल्यामुळे आपण जुने मेसेज डिलीट करून टाकतो. चॅट डिलीट करण्यामध्ये आपल्याला हिस्टरीमधून महत्त्वाचे मेसेजदेखील डिलीट होत असतात. पण तुम्हाला माहितीये का, व्हॉट्सअ‍ॅपवर एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक वर्षे जुन्या चॅट्स रिकव्हर करू शकता. एक आश्चर्यकारक फिचर वापरून तुम्ही जुन्या चॅट्स पुन्हा मिळवू शकतात. मग तो कितीही जुना मेसेज असला तरी तो तुम्ही सहजपणे परत मिळवू शकतात.

 

अशा पद्धतीने मिळवा परत

 

तुम्हाला जुने डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करायचे असतील तर यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर सेटिंग ऑन करावे लागेल. ते चालू केल्याने व्हॉट्सअ‍ॅप मेसेचा स्वयंचलित बॅकअप घेणं सुरू करेल. त्यानंतर तुम्ही जुने मेसेज कधीही परत मिळवू करू शकाल.

 

काय आहे पद्धत

 

सर्वात आधी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तुमच्या मोबाईलवरून डिलीट करून ते पुन्हा इंस्टॉल करावे लागेल.

 

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल, तो त्यात नोंदवा. त्यानंतर रिस्टोर करण्याचा पर्याय येईल. त्याला क्लिक करा.

 

व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा बॅकअप सुरू झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरील डिलीट केलेले मेसेजही दिसून लागतील.

 

चॅट रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला नेहमी बॅकअप चालू ठेवावा लागेल.

 

WhatsApp वर चॅटचा बॅकअप असा होईल

 

बॅकअपसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. त्यात मोर(More)या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

 

त्यानंतर सेटिंगवर क्लिककरून चॅट्सवर टॅप करा.

 

आता चॅट बॅकअपवर जाऊन बॅकअप तो गुगल ड्राइव्हवर क्लिक करा.

 

यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रिडायरेक्कट केलं जाईल.

 

त्यात तुम्हाला तुमचा बॅकअप सेव्ह केलेले Google खाते निवडावे लागेल. याप्रकारे तुम्ही तुमच्या अकाउंटवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे बॅकअप सेव करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -