Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत रस्त्याकडेला कचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

इचलकरंजीत रस्त्याकडेला कचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

इचलकरंजी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महानगरपालिकास्तरावर विविध प्रयत्न, उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकच हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात प्लास्टीक, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ सर्रासपणे टाकत असल्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आमराई रोड काळा ओढा, नदीवेस, कबनूर रोड, औद्योगिक वसाहत परिसर आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच कचरा टाकत असलेल्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबद्दल सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. या अनुषंगाने सामुहिक स्वच्छता, सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या शहरातील इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील विरभद्र प्रोसेस याठिकाणी कचरा पेटवल्याचे निदर्शनास आलेने सी झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुगकर यांनी विठ्ठल अनंत माने यांच्यावर कारवाई करत ५०० रुपये दंड केला. तर वॉर्ड क्रमांक ९ मध्ये कचरा डेपो नजीक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकले बद्दल ए झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे यांनी सदाशिव कांबळे यांच्यावर १८० रुपये दंडाची कारवाई केली, अशा प्रकारची कारवाईची मोहिम महानगरपालिकेने कायमस्वरूपी राबवावी, अशी मागणी होत आहे.

 

तसेच घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचीही सोय करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या या दृष्टीने शहरातील नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महानगरपालिका विविध स्तरावर राबवित असलेल्या उपाययोजनामुळे शहर कोंडाळामुक्त झाले आहे. तसेच शहराची स्वच्छता करण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेच्यावतीने दोन टप्प्यात कर्मचारी साफसफाईची कामे करीत असतात. मात्र, शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर शहरात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्हीकडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्या बरोबरच अनेक चिकन ६५ व्यावसायिक राहीलेले शिल्लक टाकाऊ पदार्थ आणून टाकत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी सुटून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना टाकाऊ पदार्थ येथे टाकण्यापासून परावृत्त करावे, तसेच संबंधितावर कारवाईचा बडगाही उगारावा अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.

 

येथील आमराई रोड, काळा ओढा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचरा इतर टाकाऊ साहीत्य मोठ्या प्रमाणात टाकत असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच नदीबेस रोडवरही मोठ्या प्रमाणात गटारीतील तसेच नागरिकांनी टाकलेला कचरा मोठ्या प्रमाणात साचत असून यामुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली आहे. तेव्हा रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने विशेष मोहीम राबवून यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -