Thursday, December 26, 2024
Homeब्रेकिंगराज्यावर पुन्हा आस्मानी संकट! राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

राज्यावर पुन्हा आस्मानी संकट! राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. राज्यात (Maharashtra Weather Update) पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यवतमाळमध्ये (Yavatmal Rain Update) गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

आधी दुष्काळाच्या झळा आणि आता अवकाळीची अवकळा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जोर दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे. आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यवतमाळ वगळता आज कुठेही राज्यात गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही . दरम्यान, राज्यात पुढील दोन तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

आज विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मध्य भारतात पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . सोबतच, काही ठिकाणी धुक्यांचे चित्र देखील बघायला मिळू शकेल.

 

अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, बाभूळगाव तालुक्यात पहाटेपासून विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे बुलढण्यात सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सर्वत्र जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडटासह जोरदार पाऊस झाला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -