T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आज (ता.०८) नामिबियाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळत आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा टी-२० फॉरमॅटमधील शेवटचा सामना आहे, त्यामुळे हा एक अतिशय खास क्षण असेल. टॉसवेळी बोलताना विराट कोहली म्हणाला की, भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण होऊ शकतो, याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत.
विराट कोहली म्हणाला की, माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम मी केले आणि ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यासाठी जागा तयार करण्याची हीच वेळ आहे. टीम इंडियाने केलेल्या कामगिरीचा अभिमान आहे.
आता वेळ आली आहे की, संघाला पुढे नेण्याची जबाबदारी पुढील गटाची आहे. रोहित शर्माही इथेच आहे, तो काही काळापासून सर्व काही पाहत आहे. तसेच संघात अनेक लीडर्स आहेत, त्यामुळे येणारा काळ भारतीय क्रिकेटसाठी चांगला आहे.
T-20 मध्ये नवा टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण ? विराट कोहलीने थेट नाव सांगितले !
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -