Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग9 डिसेंबरला लॉन्च होणार Infinix Hot 40 मोबाईल; लाईव्ह इमेज झाली लीक

9 डिसेंबरला लॉन्च होणार Infinix Hot 40 मोबाईल; लाईव्ह इमेज झाली लीक

 

Infinix कंपनी मार्केटमध्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये मोबाईल उपलब्ध करत आहे. यातच कंपनी काही दिवसांमध्ये नवीन दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वीच या स्मार्टफोनची लाईव्ह इमेज लीक झाली आहे.कंपनी लॉन्च करणाऱ्या नवीन दोन स्मार्टफोनचे नाव, Infinix Hot 40 आणि Infinix Hot 40i आहे. Infinix Hot 40 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये 9 डिसेंबरला लॉन्च करणार आहे. जाणून घेऊया या मोबाईलचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

 

Infinix Hot 40 स्पेसिफिकेशन

 

टिप्स्टर या वेबसाईटवर Infinix Hot 40 या स्मार्टफोनची लाईव्ह इमेज आणि स्पेसिफिकेशन शेअर करण्यात आले आहे. त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये 6.76 इंच IPS FHD डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनी या स्मार्टफोनमध्ये 12 नॅनोमीटर प्रोसेस वर बेस्ड असलेली मीडियाटेक हेलिओ G88 चिपसेट उपलब्ध करू शकते. यासोबतच ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर, यात अँड्रॉइड 13 वर आधारित Infinix XOC ऑपरेटिंग सिस्टीम मिळेल.

 

Infinix Hot 40i स्पेसिफिकेशन

 

Infinix Hot 40i या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच hd + डिस्प्ले मिळू शकतो. यासोबतच स्मार्टफोनमध्ये UnisocT606 प्रोसेसर मिळण्याचे चान्सेस आहे. हा प्रोसेसर 12 नॅनोमीटर प्रोसेस वर बेस्ड असेल. स्मार्टफोन मध्ये 4 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा स्मार्टफोन गोल्डन, ब्लॅक आणि ब्ल्यू या तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात येईल.

 

Infinix Hot 40 कॅमेरा

 

INFINIX HOT 40 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे लाईव्ह इमेज मध्ये कन्फर्म झाले आहे. त्यानुसार यामध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 कॅमेरा लेन्स उपलब्ध करण्यात येऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये 4 GB, 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

 

INFINIX HOT 40i कॅमेरा

 

INFINIX HOT 40i या स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या कॅमेरा सोबतच LED फ्लॅश देखील देण्यात येणार आहे. यास्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -