न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यामध्ये अपेक्षेप्रमाणेे रोहित शर्मा याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्याजागी ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि आवेश खान या आयपीएल स्टारना संघात संधी मिळाली आहे.
विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ थेट भारतात येणार आहे. या दौर्यात ते 3 टी-20 सामने तर दोन कसोटी सामने खेळणार आहेत. यातील टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. विराट कोहली याने टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी रोहित शर्माची निवड नक्की मानली जात होती. अपेक्षेप्रमाणे त्याला ही जबाबदारी देण्यात आली तर लोकेश राहुल हा टी-20 चा उपकर्णधार असेल.
रोहित शर्मा टी-20 चा नवा कर्णधार, विराटला मालिकेत विश्रांती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -