Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक! दोन दिवसांत इतके घसरले भाव

सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक! दोन दिवसांत इतके घसरले भाव

 

ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या दोन दिवसांत किंमतीत मोठी पडझड दिसून आली. जागतिक बाजारात दिग्गज गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत नशीब आजमावले. सोने-चांदीच्या किंमती पार गगनाला भिडल्या. सोन्याने 67,000 रुपये प्रति तोळ्याचा प्रवास सुरु केला तर चांदी पण ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली. जळगावच्या सुवर्णनगरीपासून ते लातूरच्या सराफा बाजारापर्यंत वाढलेल्या भावांनी वधू पित्याचे टेन्शन वाढवले. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. शहरी भागात तर सोन्याला पर्याय म्हणून प्लॅटिनमच्या दागिन्यांची क्रेझ वाढली आहे. या दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमतीत इतकी घसरण झाली.असे मोडले रेकॉर्ड

 

सराफा बाजारात सोने 65 हजारांच्या पुढे गेले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) यावर्षी 4 मे 2023 रोजी सोने सर्वात महाग होते. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि पुढे सोन्याने नवनवीन रेकॉर्ड केले. . 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो झाली होती. पण प्रत्यक्षात अनेक सराफा बाजारात सोने 66,000 रुपयांच्या घरात पोहचले होते. काही शहरात तर चांदी 78,000 रुपयांच्या घरात पोहचली होती.

 

दोन दिवसांत मोठी घसरण

 

या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 1030 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसांत सोने घसरले. 5 डिसेंबर रोजी सोने 1000 रुपयांनी घसरले. तर 6 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. 1400 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदी 2300 रुपयांनी उतरली

 

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या चार दिवसांत चांदीत 1300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी चमकली होती. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली. तर 6 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी भाव घसरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,200 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,144 रुपये, 23 कॅरेट 61,895 रुपये, 22 कॅरेट सोने 56,924 रुपये झाले. 18 कॅरेट 46,608 रुपये, 14 कॅरेट सोने 36,354 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,268 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

किंमती मिस्ड कॉलवर

 

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही http://www.ibja.co वा http://ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -