Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग'ॲनिमल'मधील न्यूड सीन्स कसे शूट झाले, सेटवर किती जण होते? तृप्ती डिमरीकडून...

‘ॲनिमल’मधील न्यूड सीन्स कसे शूट झाले, सेटवर किती जण होते? तृप्ती डिमरीकडून खुलासा

 

 

‘ॲनिमल’या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या सहा दिवसांत जगभरात कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.’ॲनिमल’मध्ये रणबीरसोबतच्या न्यूड आणि इंटिमेट सीन्समुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने झोयाची भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर तृप्तीची जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ असंही म्हटलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तृप्ती ‘ॲनिमल’मधील तिच्या इंटिमेट सीन्सविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

 

‘ॲनिमल’मधील इंटिमेट सीनपेक्षा ‘बुलबुल’मधील रेप सीन अधिक कठीण

 

‘ॲनिमल’मधील न्यूड सीनपेक्षा ‘बुलबुल’मधील रेप सीन अधिक आव्हानात्मक होतं असं तृप्तीने सांगितलं. त्या तुलनेत ‘ॲनिमल’मधील इंटिमेट सीन काहीच वाटलं नाही, असंही ती म्हणाली. सेटवर हे सीन शूट करताना फक्त चार जण उपस्थित असायचे, असाही खुलासा तृप्तीने केला. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘माझ्या मते बुलबुलमधील रेप सीन शूट करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण त्यात तुम्ही हार मानत आहात आणि ती हार मानणं खूप कठीण असतं. म्हणूनच त्या सीनच्या तुलनेत मला ‘ॲनिमल’मधील कोणतेच सीन्स कठीण वाटले नाहीत.’

 

रणबीर कपूरसोबतच्या न्यूड सीन्सबद्दल काय म्हणाली तृप्ती?

 

‘ॲनिमलमधील माझ्या सीनवर बरीच टीकासुद्धा होत आहे आणि सुरुवातीला त्या टीकेमुळे मी विचलीत झाले होते. कारण सुरुवातीच्या चित्रपटांसाठी माझ्यावर कधीच टीका झाली नव्हती. यावेळी दोन्ही बाजू पहायला मिळत आहेत. पण जोपर्यंत मी कम्फर्टेबल आहे, जोपर्यंत सेटवरील माझ्या आजूबाजूचे लोक मला कम्फर्टेबल होऊ देत आहेत, जोपर्यंत मला असं वाटतंय की मी जे करतेय ते योग्य आहे तोपर्यंत मी ते करत राहणार. कारण एक अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून मला काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे’, असंही ती पुढे म्हणाली.कसे शूट झाले इंटिमेट सीन्स?

 

‘ॲनिमल’च्या सेटवर इंटिमेट सीन्स कशा पद्धतीने शूट करण्यात आले, याबद्दलही तृप्तीने सांगितलं. ‘सेटवर त्यादिवशी फक्त चार जणच होते. मी, रणबीर, संदिप सर आणि डीओपी (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी). दर पाच मिनिटांनी ते मला विचारायचे की तू ठीक आहेस का? तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का? तू कम्फर्टेबल आहेस का? जेव्हा तुमच्या आजूबाजूची लोकं तुम्हाला इतका पाठिंबा देतात, तेव्हा तुम्हाला विचित्र असं काही वाटत नाही. अर्थात ज्या लोकांना सेटवरील कामकाम कसं चालतं हे माहीत नसतं आणि इंटिमेट सीन्स कसे शूट केले जातात हे माहीत नसतं, त्यांच्या काल्पनिक विश्वात बऱ्याच गोष्टींचा शिरकाव होतो. त्यांच्यासाधी हे धक्कादायक असेल आणि प्रत्येकाची मतं असतात. पण मी फार कम्फर्टेबर होते आणि माझ्या भूमिकेच्या गरजेनुसार मी पुढेही तसे सीन्स आवर्जून करेन’, असं तिने स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -