Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमाझं डोकं दुखतंय असं म्हणत सख्ख्या मामाने चिमुकल्या भाच्याचा घेतला जीव

माझं डोकं दुखतंय असं म्हणत सख्ख्या मामाने चिमुकल्या भाच्याचा घेतला जीव

 

भाचा रडत असल्याने माझं डोकं दुखत आहे, अस म्हणत सख्ख्या मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. ही घटना ५ डिसेंबरला धुळे शहरातील फिरदोसनगर येथे भरदिवसा घडली.मिळालेल्मया अधिक माहितीनुसार, रियम बी. एजाज हुसेन (रा. फिरदोसनगर, रातराणी चौक, मसूद मशिदीजवळ, धुळे) या महिलेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून परिवारासह फिरदोसनगरात राहतात. त्यांचे पती लॅब टेक्नेशियन आहेत. त्यांना मोहम्मद हम्माद (वय साडेपाच वर्षे) व मोहम्मद हाजिक (४) अशी दोन मुले आहेत.

 

तिचे आई-वडील आणि भाऊ नुरुल अमीन नईम अहमद घरापासून जवळच राहतात. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तिला आणि तिच्या मुलांना पतीने तिच्या आई-वडिलांकडे सोडले आणि कामासाठी बाहेर निघून गेले. मरियम घरात आईसोबत बोलत असताना मोहम्मद हाजिक आणि त्याचा मामा नुरुल अहमद दोघेजण खेळत होते.

 

म्हणून मी मोहम्मदला ड्रममध्ये टाकून दिलं

 

काही वेळातच मरियमला मुलाचा आवाज येत नसल्याने तिने त्याचा शोध सुरू केला. यावेळी तिला मुलगा मोहम्मद घरातील बाथरूमच्या प्लॅस्टिकच्या टाकीत वर पाय, खाली डोकं अशा अवस्थेत दिसला. त्याला बाहेर काढून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कसलाच प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, मुलगा मोहम्मदच्या अशाअवस्थेबाबत मरियमने तिचा भाऊ नुरुल याला विचारणा केली असता त्याने ‘मोहम्मद रडत होता, त्याच्या रडण्यान माझं डोकं दुखत होतं म्हणून मी त्याला ड्रममध्ये टाकून दिलं, अशी धक्कादायक माहित नुरुल याने सांगितले.

 

दरम्मयान, रियम यांचा जेठ रफिक अहमद याने मोहम्मदला शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यावरून नुरुल अमीन नईम अहमद याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -