Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगशरद पवार, भाजप की आणखी कोणी, या तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण...

शरद पवार, भाजप की आणखी कोणी, या तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील  यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या थिअरी मांडल्या गेल्यात. आता जरांगेंच त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सांगणार आहेत. 24 तारखेनंतर आपला बोलावता धनी कोण हे सांगतोच अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केलीय.

काहीच दिवसांपूर्वी जरांगे कुणाचं खातात असं म्हणत छगन भुजबळांनी निशाणा साधला होता. जरांगेंच्या पाठी कोणती शक्ती आहे असाच रोख भुजबळांचा होता. राज ठाकरे यांनीही केला आरोप मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचा बोलवता धनी कोण ?हे कालांतराने कळेल असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण करणारे अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं होतं.

पहिल्या दिवसापासूनच जरांगे-पाटलांचा गॉडफादर कोण ही चर्चा सुरु आहे. जरांगेंच्या पाठिशी शरद पवार आहेत इथपासून जरांगेंच्या पाठिशी भाजप आहे. इथपर्यंत चर्चा आजवर रंगल्यात. विशेषत सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सारेच जरांगेंच्या पाठिशी कोण असा सवाल विचारत आहेत. त्यामुळेच 24 तारखेनंतर सांगतो पाठिशी कोण असं म्हणत जरांगेंनीही टोला लगावलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -