Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशिंदे गटाच्या दोन मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद नाकारलं, ‘त्या’ उत्तराने सर्वांच्या...

शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद नाकारलं, ‘त्या’ उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या

शिवसेना आमदार अपात्रतेची आज नियमित सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी मोठा दावा केला. “उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख नव्हते तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ते चिरंजीव असल्याने त्यांनी पक्षप्रमुख म्हटलं जात होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आणि आदर होता म्हणून उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हटलं जात होतं. 1999 च्या पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुख पद नसतानाही आम्ही उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रमुख म्हणायचो”, असा मोठा दावा मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी फेरसाक्ष नोंदवत असताना केला.

वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांची फेरतपासणी घेत असताना 72 प्रश्न विचारले. अखेर 72 प्रश्नांच्या उत्तरानंतर उलट तपासणी संपली. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता निर्णय वेळे आधीच लागण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत उलट साक्ष संपवा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांना दिले आहेत.

दरम्यान, उद्याच्या सुनावणीत दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर १६ ते २० डिसेंबर दरम्यान होणार अंतिम सुनावणी होईल. मग 20 डिसेंबर नंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नेमके सवाल-जवाब काय? कामत – तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्याप्रमाणे तुम्ही निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या महाविकास आघाडीमुळे नाराज होता, हे खरे की खोटे? सामंत – होय, मी नाराज होतो. कामत – तुम्ही २०१९ ते जून २०२२ पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद भुषविण्याइतपत नाराज होता का? सामंत – ज्यावेळी मी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो.

त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो, भविष्यात तशीच कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. म्हणून मी मंत्री मंडळात सामील झालो.

कामत – उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करावी म्हणून भेटला आहात असे नमूद केले. तुम्ही एकनाथ शिंदे यांना तशी विनंती का केली नाही?

मंत – मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे देखील अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भेट घेऊन हे सांगितले होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

कामत – तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केली कारण उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होते. ते शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होते. हे चूक की बरोबर?

सामंत – बरोबर. कामत – उद्धव ठाकरे यांना तुम्ही 2019 मध्ये भाजपसोबत युती करावी यासाठी भेटला होता असं तुम्ही म्हणत आहात मग तुम्ही एकनाथ शिंदे यांना ही विनंती तेव्हा का नाही केली?

उदय सामंत -आम्ही गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे यांनीही ऊद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगितले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

कामत- मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती की भाजपसोबत युती करावी. कारण उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते आणि ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. हे खरे आहे का?

उदय सामंत – हे बरोबर आहे. कामत- 21 जून 2022 रोजी तुम्ही वर्षा बंगल्यावरील बैठकीला हजेरी लावली कारण तुम्हाला 21 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांनी व्हिप बजावला होता. हे खरे आहे का? सामंत- 21 तारखेला माझे विधिमंडळातील सदस्य गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि निमंत्रण दिले. पण ही बैठक कशासंदर्भात आहे हे सांगितले नव्हते. मी या बैठकीला उपस्थित होतो. पण त्यादिवशी किंवा त्यानंतर मला कुठलाही व्हिप देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही. आणि कोणतीही सही कुठच्याही कागदावर केलेली नाही.

कामत – तुम्ही जेव्हा म्हणता की बहुसंख्य पक्ष संघटन म्हणता तेव्हा निवडून आलेले लोकप्रतिनिधी असं आपल्याला म्हणायचं आहे का?

सामंत – म्हणजे आमदार, खासदार, विधानपरिषद सदस्य, पक्ष संघटनेचे पदाधिकारी कामत – 21 जून 2022 मधील हा पक्षादेश प्राप्त झाला हे सांगितले होते हे चूक की बरोबर?

सामंत – मी आधीच सांगितले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -