मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता असतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यापूर्वीच मागासवर्ग आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात आता निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता असतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यापूर्वीच मागासवर्ग आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात आता निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने आता मागासवर्ग आयोगाचे काय होणार? मराठा आरक्षणाचे काय होणार? असे प्रश्न उभे राहिले आहेत. तर, राज्य सरकार निरगुडे यांच्या राजीनाम्यावर या प्रतिक्रिया व्यक्त करते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.