Thursday, March 13, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : 'त्या ' अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

इचलकरंजी : ‘त्या ‘ अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

२१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ८ च्या सुमारास व्यंकटेश्वरा स्कूलजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मयत झालेल्या महिलेचे भागिरथी केरबा पाटील (वय ५४, रा. व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूलजवळ कबनूर) असे नाव आहे. याबाबत अजित केरबा पाटील (रा. कबनूर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ८ च्या सुमारास व्यंकटेश्वरा स्कूलजवळ रस्ता ओलांडताना भागिरथी पाटील यांना अनोळखी मोटरसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र राहत्या घरी त्यांचा २३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाल्याचे वर्दीत नमूद केले आहे. याबाबतची नोंद मंगळवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -