Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीआदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा; भाजपच्या नेत्याची...

आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा; भाजपच्या नेत्याची मागणी

 

 

उद्धव ठाकरे यांनाच कमळावर निवडणूक लढण्याची गरज आहे, असं विधान भाजप नेत्याने केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा, असंही या नेत्यानं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. नितेश राणे यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा पासपोर्ट जमा करा, असं म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच दिशा सालियान प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण होईल. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होईल आणि दिशा सालियानला न्याय मिळेल. असं नितेश राणे म्हणालेत. हिवाळी अधिवेशनावेळी नितेश राणे माध्यमांशी बोलत होते. तेव्हा नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे.नितेश राणे यांचा आदित्या ठाकरेंवर निशाणा

मी सरकारचे आभार मानेल. दिशा सालियन असो सुशांत सिंग राजपूत यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करत आहेत. तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. काल एसआयटी नेमली आहे. या मर्डर आणि गँग रेप प्रकरणातील हे आरोपी मुक्त आणि मोकाट फिरत आहेत. हे सगळे पकडले जातील. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळेल. आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लूक आऊट नोटीस काढावी. पासपोर्ट जप्त करावा. अशी मागणी सरकारकडे मी करत आहे, असं नितेश राणे म्हणालेत.उद्धव ठाकरेंना सवाल

मुलगाच नालायक निघाल्यावर वडील काय करणार? त्याच्या थोबाडाला आम्ही कुलुप लावलं आहे का? तुमचं सरकार होतं तेव्हा चौकशी का लावली नाही?, असा सवाल नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.राऊतांवर निशाणा

संजय राऊत आम्हाला राजकीय दलाल वाटतो. स्वतः चा भाऊ मशालवर लढणार की शरद पवार यांच्या चिन्हावर लढणार? हे सांगावं. मशाल चिन्ह नको म्हणून घरात भांडण सुरु आहे. त्याच्या मालकाला पण कमळसोबत यायची इच्छा आहे, मग पायघड्या का घालत आहेत?, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -