Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीविधानभवनातच काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; कुणी धरली भाजपची वाट?

विधानभवनातच काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; कुणी धरली भाजपची वाट?

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात काही पक्षांमध्ये इन्कमिंग वाढलं आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. चक्क विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान काही पक्षप्रवेश पार पडले. हिवाळी अधिवेशनातंच भाजपकडून पक्षप्रवेशाचा झाले आहेत. हिॅगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी विधानभवनातील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश उरकले. हिंगणघाट मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेनेच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भाजप प्रवेशाची हिंगणघाटमध्ये जोरदार चर्चा होतेय.

काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
हिंगणघाटमधील या नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच पक्ष प्रवेश झाला. आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून पक्षप्रवेशावर भर आहे. अशात हिॅगणघाटमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस शहराध्यक्ष संदीप देरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतराची जिल्ह्यात चर्चा होतेय.

या नेत्यांनी केला पक्ष प्रवेश
सभापती ललित डगवार, सुशीला लढी, रवींद्र लढी शिवसेना प्रमुख, कमलेश भोयर उपसरपंच साखरा, रमेशराव मडावी सरपंच परडा, संजय शेळकी धपकी यांनी भाजपत प्रवेश केला. सौ. नीता शेळकी सरपंच- धपकी , प्रल्हाद नांदुरकर ग्रामपंचायत सदस्य- परडा, नामदेवराव उमाटे- समुद्रपूर, नारायणराव बादाने- पारोधी, विनायकराव मोंढे- अंतरगाव यांनीही भाजपची वाट धरली आहे. निवडणूकीची तयारी म्हणून भाजपकडून ग्रामीण भागात मिशन पक्षप्रवेश राबवण्यात येतंय. त्याच अंतर्गत हिंगणघाटमधील नेत्यांचे पे पक्ष प्रवेश झाले आहेत.

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच राजकीय नेत्यांचं पक्षांतर सुरु झालं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय बदल झाल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. त्यामुळे येत्या काळाता राज्याच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -