दुबईत 8 डिसेंबरपासून 8 संघांमध्ये क्रिकेट अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. 5 दिवसानंतर अखेर 8 संघांमधून सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. सेमी फायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूएई या 4 संघांनी एन्ट्री केली आहे. तर तितक्याच अर्थात 4 संघाचा पत्ता कट झाला आहे. आता या 4 संघात शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी दोन्ही सेमी फायनल आणि 15 डिसेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. बुधवारी 13 डिसेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि यूएई विरुद्ध जपान यांच्यात सामने खेळवण्यात आले. या सामन्यांच्या निकालानंतर सेमी फायनलचं गणित स्पष्ट झालं.
बांगलादेशने आधीच 2 सामने जिंकून सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलं होतं. त्यामुळे बी ग्रुपमधून श्रीलंकेसाठी करो या मरो असा सामना होता. बांगलादेशने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकेचा या पराभवासह आशिया कपमधून बाजार उठला. तर दुसऱ्या सामन्यात यूएईने जपानवर 107 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बी ग्रुपमधून बांगलादेश आणि यूएई या 2 संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं. तर ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि पाकिस्तानने आधीच क्वालिफाय केलं होतं. त्यामुळे ए ग्रुपमधून अफगाणिस्तान, नेपाळ तर बी ग्रुपमधून श्रीलंका आणि जपानचा बाजार उठला आहे.
उपांत्य फेरीतील दोन्ही सामने एकाच दिवशी
दरम्यान सेमी फायनलमधील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध यूएई असा सामना हा 15 डिसेंबरला होणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. या सामन्याचं आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलंय. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. या सामन्यालाही सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. हा सामना आयसीसी अकादमी ग्राउंड, दुबई येथे आयोजित करण्यात आला आहे. अर्थात टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळतील.
टीम इंडिया | उदय सहारन (कॅप्टन), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, रुद्र पटेल, नमन तिवारी, इनेश महाजन आणि धनुष गौडा.
बांगलादेश टीम | महफुजुर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मो. रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, , परवेझ रहमान जिबोन, रोहनत दौल्ला बोरसन, मो. इक्बाल हुसेन इमॉन, मारुफ मृधा, मो. रफी उज्जमान रफी, वासी सिद्दीकी, आदिल बिन सिद्दिक, मोहम्मद रोहनत, मोहम्मद असरफुझमान आणि बोरान्नो मोहम्मद इक्बाल.
पाकिस्तान टीम | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), शाहजैब खान, अझान अवेस, मोहम्मद झीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफात मिन्हास, शमील हुसेन, अमीर हसन, उबेद शाह, खुबैब खलील, अली असफंद, अहमद हुसैन, नावेद अहमद खान आणि नजाब खान.
यूएई टीम | अयान अफझल खान (कर्णधार), अक्षत राय, ध्रुव पराशर, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), तनिश सुरी, एथन डीसूझा, मारूफ मर्चंट, अम्मर बदामी, हार्दिक पै, अयमन अहमद, ओमिद रहमान, हरित शेट्टी, श्रेय सेठी, यिन राय आणि हर्षित सेठ.