Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये कमी दरात सिटी स्कॅनची सोय : नागरिकात समाधान

इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये कमी दरात सिटी स्कॅनची सोय : नागरिकात समाधान

ताजी बातमी / ऑनलाईन टिम
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या सिटीस्कॅन मशिनचे सोमवारी आमदार प्रकाश आवाडे, माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवि जावळे आणि वयोवृध्द रुग्ण विमल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. सिटीस्कॅन कामी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने याठिकाणी सिटीस्कॅनची सुविधाही देण्यात आली आहे.

या सिटीस्कॅन मशिनचा शुभारंभ सोमवारी आमदार प्रकाश आवाडे, माणुसकी फौंडेशन संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांच्या हस्ते फित कापून आणि वयोवृद्ध रुग्ण विमल चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, रुग्णकल्याण सदस्य कपिल शेटके उपस्थित होते. रुग्णांना अत्यंत कमी दरात सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मौलाना जमादार, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सौ. उर्मिला गायकवाड, संजय केंगार, महादेव कांबळे, चंद्रकांत पाटील, नरसिंह पारीक, रमेश कबाडे, अविनाश कांबळे, रुबन आवळे, नितेश पोवार, विजय पाटील, राजेंद्र बचाटे, रमेश पाटील, नजमा शेख, मंगल सुर्वे, सपना भिसे, अंजुम मुल्ला, अलका शेलार, सीमा कमते, तुळसाबाई काटकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. सुनिल देशमुख, डॉ. प्रकाश मोरे, सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक भारत शिंदे, सौ. सीमा कदम, इजाज मुल्ला, योगेश सर्वदे, अजित शेटकाळकर, करण शिंगाडे, सिटीस्कॅन टेक्निशिएन ऋषिकेश रावळ, प्रशांत शिंगाडे, अभिजीत जगदाळे आदींसह परिसेविका, अधिपरिचारीका, कर्मचारी, रुग्ण व माणुसकी फौंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -