शेअर्सची विक्री करून ती २२५० कोटी रुपये उभारणार आहे, असं एअरलाइन्स कंपनी स्पाइसजेटने आज आपल्या नियामक फायलिंगमध्ये सांगितले. स्पाइसजेटच्या बोर्डाने खासगी प्लेसमेंटच्या आधारावर इक्विटी शेअर्स/इक्विटी वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे.
म्हणून कंपनी निधी उभारत आहे shaire
नियामक फायलिंगमध्ये एअरलाइन्सने सांगितले की, स्पाईसजेटची उपस्थिती आणि बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी २२५० कोटी रुपये वापरले जातील. याशिवाय हा निधी कंपनीला मजबूत आर्थिक पाया देईल.
सप्टेंबरच्या तिमाहीत तोटा झाला shaire market
गेल्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांनुसार, या कालावधीत स्पाइसजेटला ४२८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३ च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ८३५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.
शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले shaire market
स्पाइसजेटचे शेअर्स ४.१८ टक्क्यांनी म्हणजे २.५३ रुपयांनी घसरले आणि ५८.०४ वर काल बंद झाले. विशेष म्हणजे काल शेअर बाजारही लाल चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स ३७७ अंकांनी घसरून ६९,५५१ वर बंद झाला आणि निफ्टी ९० अंकांनी घसरून २०,९०६ वर बंद झाला. एअरलाइन्सने कालच माहिती दिली होती की, ती NSE वर देखील त्यांचे शेअर्स सूचीबद्ध करणार आहे. या बातमीनंतर एअरलाइन्सचे शेअर्स ११ टक्क्यांहून अधिक वाढले.