तुम्ही देखील UPI द्वारे ऑटोमॅटिक पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी काही UPI द्वारे स्वयंचलित पेमेंटची मर्यादा 15,000 रुपयांवरून 1 लाख रुपये प्रति व्यवहारापर्यंत वाढवली आहे.म्युच्युअल फंडांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. NPCI ने आवर्ती पेमेंटसाठी UPI AUTOPAY ची सुविधा प्रदान केली आहे.
ग्राहक आता मोबाइल बिल, वीज बिल, EMI पेमेंट्स, मनोरंजन/OTT सबस्क्रिप्शन, विमा, म्युच्युअल फंड इत्यादी आवर्ती पेमेंटसाठी कोणतेही UPI ऍप्लिकेशन वापरून आवर्ती ई-आदेश सक्षम करू शकतात.आत्तापर्यंत 15,000 रुपयांच्या वरच्या आवर्ती व्यवहारांसाठी कार्ड, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स आणि UPI वर ई-सूचना/स्थायी सूचना अंमलात आणताना ‘अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’ (AFA) मध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
आरबीआयने ‘आवर्ती व्यवहारांसाठी ई-सूचनांची अंमलबजावणी’ वर जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन, विमा प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी प्रति व्यवहार मर्यादा 1,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
UPI | शक्तीकांत दास यांनी केली होती घोषणा
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवड्यात द्विमासिक पतधोरण आढाव्यादरम्यान, UPI द्वारे स्वयंचलित व्यवहारांची मर्यादा 15,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात 11.23 अब्जाहून अधिक व्यवहारांसह, UPI ही लोकसंख्येच्या मोठ्या वर्गासाठी डिजिटल पेमेंटची पसंतीची पद्धत म्हणून उदयास आली आहे.