Wednesday, August 27, 2025
Homeब्रेकिंगनागपुरात लग्नाच्या वराडाचा भीषण अपघात! 6 जणांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

नागपुरात लग्नाच्या वराडाचा भीषण अपघात! 6 जणांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

 

नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका लग्नाच्या वराडाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी क्वॉलीस आणि ट्रकची धडक झाल्यामुळे हाच भीषण अपघात घडला आहे.या अपघाताच्या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, एक क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. तर दुसऱ्या बाजूला नागपूरहून क्वॉलीस कारमधून सात जण लग्न उरकून पुन्हा आपल्या घरी निघाले होते. परंतु मधल्या रस्त्याचा काळाने त्यांच्यावर घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना सोनखांब आणि ताराबोडी येथे येताच एका ट्रकने क्वॉलीस कारला धडक दिली ही धडक एवढे जोरात होती की, 7 जणांचा जागी मृत्यू झाला. तसेच, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे ट्रक आणि कारचे मोठे नुकसान झाले.

 

या अपघाताची माहिती पोलिसांनाच मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी मिळून कार मधल्या व्यक्तींना बाहेर काढले. तसेच जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच, या घटनेची माहिती अपघातग्रस्त झालेल्या कुटुंबियांना देण्यात आली. सध्या जखमी झालेल्या व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -