Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगJio ग्राहकांसाठी गुड न्यूज ! प्लॅन सोबत 1 वर्ष मोफत मिळणार Disney+Hotstar,...

Jio ग्राहकांसाठी गुड न्यूज ! प्लॅन सोबत 1 वर्ष मोफत मिळणार Disney+Hotstar, रोज अनलिमिटेड…

 

 

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, (Reliance Industries) रिलायन्स इंडस्ट्रीची रिलायन्स जिओ ही कंपनी देशातील टेलिकॉम मार्केटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा देशात सर्वात मोठा युजरबेस आणि मार्केट शेअर आहे.

 

ही कंपनी लॉन्च झाल्यापासून ते आत्तापर्यंत सातत्याने वेगवेगळ्या योजना आणत आहेत. ज्यावेळी ही (Reliance Industries) कंपनी लॉन्च झाली त्यावेळी त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात मोफत इंटरनेट आणि बॅलन्स ग्राहकांना उपलब्ध करून दिला. परिणामी त्यांची ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.सध्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना एकाधिक योजनांसह रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. Jio द्वारे असे अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर केले जात आहेत, ज्यात OTT सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आज आपण अशाच एका प्लॅन बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

विशेष म्हणजे हा ओटीटी सबस्क्रिप्शन चा प्लॅन खूपच स्वस्त देखील आहे. जिओ कंपनी फक्त 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये 1 वर्ष विनामूल्य Disney + Hotstar ऑफर करत आहे. म्हणजे 28 दिवसांच्या रिचार्ज वर तुम्हाला तब्बल एक वर्ष डिस्ने + हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहायला मिळणार आहेत.म्हणजे तुम्हाला हॉटस्टार चे वेगळे सबस्क्रीप्शन घेण्याची गरज भासणार नाही. साहजिकच यामुळे तुमचा मोठा पैसा वाचणार आहे. तुम्ही तुमच्या जिओ नंबरवर या विशेष प्लॅन सह रिचार्ज केला की तुम्हाला ही सेवा मोफत मिळणार आहे. आता आपण या प्लॅन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

कसा आहे हा प्लॅन ?

हा प्लॅन 598 रुपयाचा आहे. यामध्ये तुम्हाला दिवसाला दोन जीबी डेटा 28 दिवसांच्या व्हॅलिडीटी सह मिळतो. सोबतच या कालावधीसाठी 100 एसएमएस मिळतात. एवढेच नाही तर डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रीप्शन देखील मिळते.

 

विशेष म्हणजे हे सबस्क्रिप्शन तब्बल एका वर्षाच्या कालावधीसाठी मिळते. जिओ टीव्ही जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड याचा देखील एक्सेसचा लाभ या प्लॅन सोबतच दिला जातो. एवढेच नाही तर या प्लॅनने तुम्ही रिचार्ज केला तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. ज्या ठिकाणी 5G रोल आउट झाले आहे त्या ठिकाणी हा अनलिमिटेड 5g डेटा दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -