Sunday, December 22, 2024
Homeसांगलीखाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघे अल्पवयीन ताब्यात

खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघे अल्पवयीन ताब्यात

 

 

शाळा सुटल्यावर घराकडे जात असताना खाऊचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर तिघा अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार जत तालुक्यातील एका गावात समाेर आला आहे. ही घटना गुरुवार दि.१४ राेजी सायंकाळी घडली. तीनही अल्पवयीन मुलांना शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पीडित बालिका गावापासून चार किलाेमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर राहते. ती दररोज चालत शाळेत जाते. जवळच्या वस्तीवर असलेली १२, १४ व १६ वर्षाची तीन मुलेही तिच्याच शाळेत शिकतात. सर्वजण नेहमी एकत्रच शाळेत जात-येत असत. गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या तीन मुलांनी पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवत रस्त्याच्याकडेला असलेल्या ओहळीत नेले. तिच्यावर बलात्कार केला. रात्री वेदना झाल्याने तिने आईला आपल्याला त्रास हाेत असल्याचे सांगितले. त्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

 

याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. संबंधित तीनही अल्पवयीन मुलांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्याच्या तसेच बाल सुधारगृहातरवाना करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -