दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वेमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय.दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही मेगा भरती नक्कीच म्हणावी लागणार आहे. पश्चिम मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 15 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास सुरूवात झालीये. उशीर न करता इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. मग उशीर अजिबातच न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. WCR inwcr.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील.
विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 पदांसाठी होत आहे. दहावी पास असण्यासोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असावे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 18 ते 24 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उशीर न करता इच्छुकांनी या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. इतकेच नाही तर मुलाखत देखील घेतली जाणार नाहीये. यामुळे इच्छुकांनी फटाफट अर्ज या भरती प्रक्रियेसाठी करावीत. जेबीपी डिव्हीजनमध्ये 1164 पदे, कोटा डिव्हीजनमध्ये 853 पदे, सीआरडब्ल्यूएस बीपीएलमध्ये 170 पदे, डब्ल्यूआरएस कोटाध्ये 196 पदे , जेबीपी मुख्यालयामध्ये 29 पदे भरली जाणार आहेत.
ही मोठी बंपर भरती आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपली अर्ज दाखल करावी लागणार आहेत. अर्ज करताना हे व्यवस्थितपणे चेक करा की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.