Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगरणबीर कपूरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १५ दिवसांत केली बक्कळ कमाई

रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ बॉक्स ऑफिसवर सुसाट, १५ दिवसांत केली बक्कळ कमाई

 

 

ॲनिमल’ सिनेमाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली होती. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.काही केल्या ‘ॲनिमल’ची क्रेझ कमी होत नाहीये. या सिनेमातील गाणी, संवाद आणि काही सीन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. प्रदर्शनाच्या १५ दिवसांनंतरही ‘ॲनिमल’चे शो हाऊसफूल होत आहेत.

 

१ डिसेंबरला प्रदर्शित झालेला ‘ॲनिमल’ चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमाचे बॉक्स ऑफिसचे आकडे समोर आले आहेत. संदीप वांगा रेड्डीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने १५व्या दिवशी ७.५ कोटींची कमाई केली आहे. ‘ॲनिमल’सिनेमाने आत्तापर्यंत जगभरात ७८४.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या वीकेंडला हा सिनेमा ८०० कोटींचा टप्पा पार करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.’ॲनिमल’ चित्रपटात रणबीरबरोबर बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या इंटिमेट सीन आणि काही डायलॉगमुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, याचा सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही. दिवसेंदिवस ‘ॲनिमल’बद्दलची क्रेझ वाढत असल्याचं चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -