ऑस्ट्रेलियाला भारतात टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मिचेल स्टार्क हा आयपीएल 2024 ऑक्शनमधील सर्वात महागहा खेळाडू ठरला. मिचेलसाठी तब्बल 24 कोटी 50 लाख रुपये मोजलेतसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कॅप्टन पॅट कमिन्स हा आयपीएल 2024 ऑक्शनमधील दुसरा सर्वात महागहा खेळाडू ठरला. पॅटसाठी सनरायजर्स हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजले. पॅटची 2 कोटी रुपये इतकी बेस प्राईज होती. पॅटच्या निमित्ताने आतापर्यंत महाग ठरलेल्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयातइंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन हा 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. सॅमला पंजाब किंग्सने 18 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर उंचपुरा कॅमरुन ग्रीन हा सॅम करननंतर सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने कॅमरुनला 2023 साली 17 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.इंग्लंडचा अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्सने 2023 मध्ये खरेदी केलं होतं. सीएसकेने स्टोक्ससाठी 16 कोटी 25 लाख रुपये मोजले.दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर ख्रिस मॉरीस आयपीएल इतिहासातील पाचवा महागडा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सने ख्रिससाठी 2021 मध्ये 16 कोटी 25 लाख रुपये खर्चले होते.