22 जानेवारी 2024 ला अयोध्येत श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा नेत्रदिपक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील असंख्य नामवंत लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या ऐतिहासीक सोहळ्याचा भाग होण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरकरांना निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येत पार पडणाऱ्या सोहळ्याच्या निमंत्रितामध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना बरोबरच संत तुकाराम, संत नामदेव महाराजांचे वंशज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्तांना निमंत्रण देण्यात आले आहे.
अयोध्येचा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पंढरपूरमधून ज्या खास व्यक्तिंना निमंत्रित केले आहे त्याचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक काशीच्या गागाभट्ट यांच्या उपस्थितीत झाला होता आणि महाराष्ट्रातील पैठण, पंढरपूर व इतर तिर्थक्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते अशी नोंद आहे. त्यापैकी पंढरपूरचे प्रल्हाद महाराज बडवे हे विशेष निमंत्रित होते आणि त्यांचेच वशंज हभप अशितोष बडवे पाटील यांना आयोध्येहून मंदिर उद्घाटनप्रसंगी आमंत्रित करण्यात आले आहे.
पांडुरंगाचे परंपरागत प्रमुख पुजारी म्हणून बडवे यांच्यासह सेवेधारी मंडळी पैकी पांडुरंगाच्या पादुका असणाऱ्या कालाच्या वाड्यातील हरिदास महाराज यांच्याबरोबर रूक्मिणीचे वंशपरंपरागत पुजारी उत्पात यांनाही खास निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रची थोर संत व वारकरी संप्रदायाचे महत्व जाणून महान संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या वंशज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त वासकर महाराजांबरोबर, देगलूरकर महाराज व इतर महत्त्वाचे परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना आमंत्रित करण्यात आले आहे.