नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या आधीच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची अन मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. आज अर्थातच 22 डिसेंबर 2023 पासून गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत.
प्रति सिलेंडर 39.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त 19 किलोच्या सिलेंडरसाठी राहणार आहे.
म्हणजे फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कायम राहणार आहेत.
मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झालेल्या असल्या तरी देखील सर्व सामान्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना थेट फायदा होणार नसला तरी देखील अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होणार आहे.
दरम्यान आता आपण नवीन दर लागू झाल्यानंतर व्यावसायिक सिलेंडरच्या शहरानुसार किमती काय आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कालपर्यंत 19 किलो सिलेंडरची किंमत 1796.50 एवढी होती. आता मात्र राजधानीत व्यावसायिक सिलेंडर 1757 रुपयाला मिळणार आहे.
कोलकत्त्याला काल पर्यंत 1908.00 रुपयाला व्यवसायिक सिलेंडर मिळत होते. आता मात्र 1868.50 रुपयाला व्यावसायिक सिलेंडर मिळतं होते.
आर्थिक राजधानी मुंबईत काल पर्यंत 1749.00 रुपयाला सिलेंडर मिळतं होते. आता मात्र या सिलेंडरची किंमत 1710.00 रुपये एवढी आहे. तसेच चेन्नईत आता 1929.00 रुपयाला व्यावसायिक सिलेंडर मिळणार आहे.
काल पर्यंत येथे सिलेंडर 1968.50 रुपयाला उपलब्ध होत होते. निश्चितच दर कपातीचा सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.