ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह व नक्षत्रांचे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव, आर्थिक, मानसिक व शारीरिक स्थितीवर काही प्रमाणात प्रभाव पडतच असतात. जेव्हा हेच ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हाच त्यांच्या गोचर कक्षेत येणाऱ्या अन्य ग्रहांच्या स्थितीनुसार काही वेळा शुभ- अशुभ योग्य निर्माण होत असतात. येत्या सहा दिवसांनी असाच एक अत्यंत लाभदायक मंगल योग तयार होत आहे. २०२३ च्या शेवटाकडे तयार होणारा हा राजयोग काही राशींच्या आयुष्याला कमालीचा वेग मिळवू देऊ शकतो ज्यामुळे केवळ २०२३ चे उर्वरित दिवसच नव्हे तर २०२४ च्या नववर्षातील सुरुवातीचे निदान ४ महिने तरी या राशी अत्यंत लाभदायक कालावधीचा अनुभव घेऊ शकतात. या मंडळींना धनलाभासह प्रगतीच्या संधी चालून येऊ शकतात. हा राजयोग नेमका कधी निर्माण होत आहे व त्याचा लाभ कोणाला होणार हे सुद्धा जाणून घेऊया..
आदित्य मंगल राजयोग कधी होणार सुरु?
वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, २८ डिसेंबरला सूर्य व मंगळ यांची युती होऊन आदित्य मंगल राजयोग निर्माण होणार आहे. सूर्य देव अगोदरच राशी परिवर्तन करून धनु राशीत स्थिर झाले आहेत तर मंगळ सुद्धा आपल्या परिक्रमेच्या कक्षेत आहेत. सूर्य व मंगळ यांची युती होताच आदित्य मंगल राजयोग निर्माण होणार आहे. याचा प्रभाव सर्वच राशींवर होणार असला तारू तीन अशा राशी आहेत ज्या सर्वाधिक लाभ मिळवू शकतील.
मेष रास
आदित्य राजयोग निर्माण झाल्याने पुढील कालावधी मेष राशीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत हा राजयोग सातव्या स्थानी तयार होत आहे त्यामुळे येत्या काळात करिअर किंवा थोडक्यात तुमच्या कर्मस्थानी प्रभाव दिसून येऊ शकतो. नोकरी बदलाचे संकेत आहेत. तुम्हाला धार्मिक कार्यांमध्ये रुची वाटू शकते. तुम्हाला पुढील वर्षात या वर्षातील काही मोडकळीस आलेल्या योजनांची उभारणी करता येईल. परदेश यात्रेचे योग्य आहेत. २०२४ मध्ये तुम्हाला वैवाहिक सुख लाभू शकते.
सिंह रास
सिंह राशीच्या गोचर कुंडलीत पाचव्या स्थानी आदित्य मंगल राजयोग निर्माण होत आहे. आपल्याला येत्या काळात संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते. प्रेम संबंध पूर्णत्वास जाऊ शकतात. लग्नाचे योग नशिबात दिसून येत आहेत. जमिनीचे व्यवहार मार्गी लागू शकतात. व्यवसायातून धनप्राप्ती होऊ शकते. अध्यात्माची आवड वाढू शकते. आपल्याला होणारा लाभ हा आयुष्यातील एखाद्या नव्या पाहुण्याच्या प्रवेशाने होऊ शकतो. अनपेक्षित व्यक्तींकडून सुख लाभेल. पूर्वग्रह थोडे बाजूला सारून ठेवावे.
धनु रास
आदित्य मंगल राजयोग हा धनु राशीसाठी परिणामकारक ठरू शकतो. हा राजयोग मुळातच आपल्या राशीतून तयार होत असल्याने आपल्याला येत्या काळात सर्व प्रभाव प्रथम हस्ते अनुभवता येतील. २०२४ च्या सुरुवातीला आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळू शकते. आपल्या मधुर वाणीने आपण अनेक कामांना मार्गी लावू शकता. आपल्याला करिअरच्या दृष्टीने सुद्धा येणारे वर्ष फायदेशीर ठरू शकते. जर आपण वेळीच योग्य तो बदल स्वीकारलात तर प्रचंड धनलाभ होऊ शकतो. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. आपल्यावर वारंवार कौतुकाचा वर्षाव होईल अशी एखादी कृती हातून घडू शकते