राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये 3 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान 21 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तर 16 ते 22 डिसेंबर दरम्यान 68 जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण हे मुंबईमधील आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यामध्ये एकूण 676 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत 8, ठाण्यात 4, कल्याण-डोंबिवलीत 1, रायगडमध्ये 1, सांगलीत 2, पुण्यात 1 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत.
सध्या राज्यात एकूण 53 एक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 6 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. याशिवाय 2 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत सर्वाधिक 34 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ठाण्यात 14, रायगडमध्ये 4, पुण्यात 10, सांगलीत 2, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि कोल्हापुरात 1 एक्टिव्ह रुग्णआ हेत.