Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर; दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीस अटक

कोल्हापूर; दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीस अटक

राजारामपुरी १२ वी गल्लीतील संजीता सुधाकर शिंदे यांच्या घरातून पाच तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यावर मोलकरणीने गुरुवारी लंपास केले होते. याबबत शिंदे यांनी राजारामपुरी पोलिसात चोरीची फिर्याद दिली होती. पोलिसांनी संशयित मोलकरीण निकिता सचिन जाधव ( वय २८, रा. राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर) हिला शुक्रवारी अटक केली. चोरीचे दागिने जप्त केले.

पोलिसांनी सांगितले की, संजीता शिंदे यांच्या घरात निकिता मोलकरीण म्हणून काम करीत होती. दरम्यान, २५ सप्टेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत संजीता या घरात नसल्याचे पाहून त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून पाच तोळे वजनाचे आणि दोन लाख ५४ हजार किमतीचे सोन्याचे गंठण निकिता हिने चोरले.

याप्रकरणी संजीता यांच्या फिर्यादीवरून निकिता हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तिला ताब्यात घेवून चौकशी केली. त्यावेळी सुरूवातीस ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. तिला विश्वासात घेवून विचारल्यानंतर चोरीची कबुली दिली. तिच्याकडून चोरीचे दागिणे जप्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -